जगामध्ये भारतीय सिनेमाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. एका संपूर्ण वर्षामध्ये भारतीय सिनेमामध्ये सर्वाधिक चित्रपट रिलीज होतात.त्यामध्येच बॉलीवुड मधील दोन मोठ्या चित्रपटाची टक्कर होणार आहे . “सिंघम अगेन” आणि “भूल भुलैया 3” हे चित्रपट 1 नोव्हेंबर रिलीज होणार असून बॉलीवुड मध्ये होणार मोठी टक्कर होणार आहे!
रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधील सिंघम चित्रपटाची पुढची फ्रेंचायझी “सिंघम अगेन” गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर सिंघम अगेन चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, रणवीर सिंह, करीना कपूर, दीपिका पदुकोण महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.हा चित्रपट बिग बजेट असून एकूण 350 कोटी रुपये बजेट असणार आहे.
त्याचबरोबर भूल भुलैया चित्रपटाची पुढची फ्रेंचायझी “भूल भुलैया 3” यामध्ये कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी आणि विद्या बालनसह अनेक मोठे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.
भूल भुलैया 3 या चित्रपटाचा एकूण बजेट 150 कोटी रुपयांचा घरात असून बिग बजेट सिनेमा ठरला आहे. या सिनेमा मध्ये कार्तिक आर्यन ,विद्या बालन,माधुरी दीक्षित,तृप्ती दीमरी ,विजय राज,राजपाल यादव ,संजय मिश्रा हे प्रसिद्ध कलाकार दिसणार आहेत.